माणसाचे मन मूलतःच स्वतंत्र असते. सगळ्या फॅसिस्टांची आणि हुकूमशहांची तीच खरी अडचण असते...
आता कोणी सामाजिक प्रश्नाबद्दल बोलले तर ‘यांना काय करावयाचे’ असा प्रश्न विचारणारे निर्माण झाले आहेत. समाजाची धर्म, जाती, पारंपरिक श्रद्धा अशा अनेक आधारांवर विभागणी झाली आहे. पूर्वीही समाजात अनेक भेद होते, वाद होते, तरीही या सुख-दुःखाच्या जीवनात एकूण समाजाशी आपले नाते आहे, ही जाणीव कायम होती. आज ही जाणीव तशीच शिल्लक आहे, असे सांगता येणार नाही.......